Corona Breaking : कोरोनचा विस्फोट ! एकाच दिवसात सापडले 529 रुग्ण

Ahmednagarlive24 office
Published:
Corona Breaking

Corona Breaking : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ४,०९३ झाली आहे. कोरोनाच्या ‘जेएन-१’ या सब-व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत ४० नव्या रुग्णांची भर पडल्याने याची संख्या वाढून १०९ झाली आहे.

थंडी आणि सबव्हेरियंटमुळे गत काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यतच्या आकडेवारीनुसार, २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत देशात कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ४ कोटी ५० लाख १० हजार १८९ झाली आहे.

गत २४ तासांत कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोना बळींचा एकूण आकडा ५ लाख ३३ हजार ३४० वर पोहोचला आहे. सबव्हेरियटचे ४० नवीन रुग्ण आढळल्यामुळे या रुग्णांची संख्या १०९ झाली आहे.

यात गुजरातमधील ३६, कर्नाटकातील ३४, गोव्यातील १४, महाराष्ट्रातील ९, केरळमधील ६, राजस्थान आणि तामिळनाडूतील प्रत्येकी चार आणि तेलंगणमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.८१ टक्के,

तर मृत्यूदर १.१९ टक्के आहे. देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत २२०.६७ कोटींहून अधिक डोस दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe