Corona virus : मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनाने धुमाकूळ घातला होता. परंतु लसीकरण केल्यानंतर कोरोना आटोक्यात आला. परंतु आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN-1 आपले हातपाय पसरवत आहे.
1 जानेवारी 24 रोजी महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊन 70 नवीन कोरोना बाधित रुग्ण समोर आले. यामध्ये 29 जेएन-1 चे रुग्ण होते. रविवारी राज्यात 3 हजार 347 टेस्ट करण्यात आल्या असून सध्या राज्यात ऍक्टिव्ह असणाऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे –
राज्यात कुठे किती ऍक्टिव्ह रुग्ण
ठाणे – 212 , मुंबई – 130 , पुणे – 124 , नागपूर – 50 , सिंधुदुर्ग – 2, अहमदनगर – 3, भंडारा – 3, अकोला – 3, छत्रपती संभाजीनगर – 50, रायगड – 31, सांगली – 18, सातारा – 17, बीड – 12, नाशिक – 14, अमरावती – 13, सोलापूर – 9, कोल्हापूर – 9, रत्नागिरी – 5, नांदेड – 5, जळगाव – 5, धाराशिव – 4, हिंगोली – 4 . अशा पद्धतीने राज्यात एकूण 731 सक्रिय रुग्ण.
जेएन-1 रुग्णांमध्येही वाढ
राज्यात कोरोनाबाधितांमध्ये JN-1 व्हेरिएंटचे देखील रुग्ण वाढत आहेत. या बाधितांमध्ये 29 रुग्ण JN-1 व्हेरिएंटचे बाधित आहेत. या 29 पैकी सर्वाधिक पुण्यात तब्बल 15 रुग्ण आहेत. उर्वरित ठाण्यात 5,बीडमध्ये 3, छत्रपती संभाजीनगर येथे 2, कोल्हापूर, अकोला, सिंधुदुर्ग आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एक अशी सध्या रुग्णांची सद्यास्थिती आहे.
भीती नको काळजी घ्या
नव्या व्हेरिएंटची भीती बाळगू नका, परंतु सर्वानी काळजी घ्या असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.