‘त्या’ शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या पोहचली सातवर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   कोरोनाने गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ राज्य केले तसेच त्याचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच हळूहळू सर्व काही सुरु होत असताना अनेक महिन्यांनंतर शाळा सुरु करण्यात आल्या होत्या.(corona news)

मात्र घेतलेला हा निर्णयच अंगलट आला असल्याचे चित्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दिसून आले आहे. पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील करोना पॉझिटिव्ह निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची तपासणी केली.

त्याचबरोबर इतरही काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आणखी दोन विद्यार्थी रॅपिड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या आता सात झाली आहे.

दरम्यान या शाळेलतील मुख्याध्यापकांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केली असता शाळेतील पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने इतर मुलांची तपासणी केली.

विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने शिक्षण विभागाने 23 डिसेंबरपर्यंत ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विद्यार्थ्यांची तब्येत चांगली असून काळजी करण्यासारखे नाही असे असले तरी पुढील काही दिवस विद्यार्थ्यांची वैद्यकीय परिस्थिती पाहून शाळा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नियमांचे पालन करूनच शाळा सुरु ठेवाव्यात अशा सूचना याआधीच देण्यात आलेल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe