अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- करोना विषाणूचा अत्यंत धोकादायक प्रकार मानला जाणारा ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण देशात आढळून आला आहे. कर्नाटकानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये या प्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे.
गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ७२ वर्षे आहे. गुरुवारी त्याचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.
गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी वृद्ध व्यक्तीला करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाल्याची माहिती दिली. गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम सुरू आहे. यासाठी परदेशातून अनेक लोक येत आहेत. तसेच गुजरातमध्ये दिवाळीत ५०० लोकांची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे.
सोमवार-मंगळवारी चार जिल्ह्यात विदेशातून २२० प्रवासी आले आहेत. तर गुरुवारी दुपारी एकाच दिवसात १४ हायरिस्क देशातून आणखी २ हजार २३५ लोक गुजरातला आले होते.
त्यातील २ हजार २२८ प्रवासी अहमदाबाद आणि सूरत एअरपोर्टचे होते. दरम्यान गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.
दरम्यान ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेत गुजरात सरकारने याआधीच राज्यातील आठ शहरांमध्ये १० दिवसांसाठी नाईट कर्फ्यू लागू होता. या कर्फ्यूत १० डिसेंबरपर्यंत वाढही करण्यात आली होती.
अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, जामनगर, भावनगर, गांधीनगर आणि जुनागढ या शहरांमध्ये १० डिसेंबरपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पहाटे १ ते पहाटे ५ पर्यंत सुरू हा नाईट कर्फ्यू लागू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम