राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण !

Ahmednagarlive24 office
Published:
apaharan

राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी परिसरात १७ वर्षे ६ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास तीच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. ही घटना दि. २७ जुलै २०२४ रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, या घटनेतील १७ वर्षे ६ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी परिसरात तीच्या कुटुंबासह राहत होती. दि. २६ जुलै २०२४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर पीडीत मुलगी तीच्या खोलीत झोपली होती.

दि २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलीची आई मुलीच्या खोलीत गेली असता, त्यावेळी मुलगी घरात नसल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलीचा तीच्या नातेवाईकांनी आजुबाजुला व परिसरात शोध घेतला; परंतु ती आढळून आली नाही.

मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तीच्या नातेवाईकांची खात्री झाली. त्यानंतर मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजि. नं. ८४४/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe