संगमनेरमध्ये १९ वर्षांची तरुणी बेपत्ता, सकल हिंदू समाजाकडून मोर्चाचा इशारा !

Published on -

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील १९ वर्षांची मुलगी नुकतीच बेपत्ता झाली आहे. सदर मुलीचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाच्या वतीने घारगाव पोलिसांकडे केली असून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना दोन दिवसात अटक न झाल्यास जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पठार भागातील राहणारी व सध्या एका वस्तीगृहात राहणारी १९ वर्षांची मुलगी अचानक गायब झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सदर मुलीचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाच्या वतीने घारगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. काही युवकांनी या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अपहरण करणाऱ्या युवकांना अटक न झाल्यास हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.

या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे, अशा घटना घडत राहिल्यास मुलींना घराबाहेर पडणे देखील अवघड होऊन जाईल असे मुलींच्या पालकांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe