अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढू लागली आहे. याला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे. नुकतेच लासलगाव पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 सराईत गुन्हेगार टोळीला गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टाकळी विंचूर परिसरात नाकाबंदी सुरू असताना चांदवड कडून लासलगावकडे येणारी एक कार हे वाहन नाकाबंदीपासून काही अंतरावर पोलिसांना पाहून थांबले व मागे वळून पळून जात असताना पोलिसांनी वाहनाकडे पळत जात वाहन थांबविले.
त्यावेळी हे इसम दरवाजे उघडून पळण्याचा प्रयत्न करत असताना 06 इसमांना ताब्यात घेत चौकशी केली. या इसमांची व वाहनाच्या झडतीत दरोडा टाकण्याचे साहित्य साधने मिळून आली.
याप्रकरणी साबीर शब्बीर कुरेशी (वय -28), सर्फराज बाबा शेख, (वय-19), कुर्बान इस्माईल शेख(वय-23) ,सनीराज विलास ढोकणे(वय-19), सागर ऊर्फ संदीप सुरेश कांबळे(वय-26),
योगराज मोहन सोनवणे(वय-24) सर्व राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम