अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील साकुरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून या अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान व कृषी सेवा केंद्र फोडून रोख रकमेसह खाद्य तेलाचे डबे व इतर साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री तालुक्यातील साकूर येथे घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शिंदोडी येथील उत्तम कुदनर यांच्या मालकीचे साकूर येथे साई किराणा मॉल आहे. मंगळवारी संध्याकाळी मॉल बंद करून ते घरी गेले होते.
बुधवारी सकाळी मॉल उघडण्यासाठी आले असता कार लावण्यासाठी मॉलच्या मागे गेले, तर त्यांना मॉलचा पत्रा उचकटलेला दिसला.
मॉलमध्ये जाऊन पाहिले असता खाद्यतेलाचे डबे, रोख रक्कम, कॉस्मेटिक साहित्य, किराणा आदी साहित्य चोरी गेल्याचे दिसले. या मॉलपासून जवळच असलेल्या
दिलीप हरिश्चंद्र पेंडभाजे यांच्या समर्थ ॲग्रो मॉलचाही पत्रा उचकटून लाल व गावठी कांद्याच्या बियाण्यासह रोख रक्कम चोरुन नेली.
या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम