अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. कुठे घर फोडण्यात आले, कुठे दुकान तर कुठे मोटारसायकलीच चोरट्यांनी लंपास केल्या.
यामुळे ऐन सणोत्सवात जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा – सुव्यवस्था धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. जिल्ह्यात घडलेल्या काही चोरीच्या घटनांचा आढावा पार्किंगमधून दुचाकीची चोरी शिर्डी :
सागर रामदास गोंदकर (रा .पिंपळवंडी रोड शिर्डी) यांनी शिर्डी येथील गंगवाल मार्केटच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये लावलेली बॉक्सर बजाज कंपनीची दुचाकी अज्ञात चोरटयाने चोरून नेली.
पिशवीतील ५१ हजारांचे दागिने चोरले नेवासा : मुलाकडे पिशवी ठेऊन मेडीकलमध्ये मुलासाठी खाऊ आणण्यासाठी गेलेल्या सविता संदीप ठुबे (रा. दिघी ता. नेवासा)
यांच्या पिशवीतील ५१ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरटयाने चोरून नेले. महिला मेडीकलकडे गेल्याची सांधी साधत भामटयांनी मुलाच्या हातातील पिशवीतील दागिणे लांबविले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून दुचाकी लांबविली नगर : पाईपलाईन रस्ता येथील लॉरेन्स चारूदत्त ससाणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका हॉटेलसमोर लावलेली त्यांची दुचाकी अज्ञात चोरटयानेलबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
ससाणे यांनी शोध घेऊनही ती मिळून न आल्याने त्यांनी रविवारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. श्रीराम चौकातून दुचाकी चोरी नगर :
तपोवन रोड येथील अमोल विठठल आंधळे यांनी श्रीराम चौकातील पिंपळाच्या झाडाखाली लावलेली दुचाकी दुपारच्या सुमारास चोरीस गेली.
तोफखाना पोलिस ठाण्यात आंधळे यांनी तशी फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम