काय सांगता : साबण आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण..!

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सध्या अल्पवयीन मुलांचे अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. नगर शहराजवळच्याउपनगरातील बोल्हेगाव फाटा येथील साई नगर परिसरातील साबण आणण्यासाठी दुकानात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत सदर मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची मुलगी घरातून साबण आणण्यासाठी दुकानात गेली होती.

त्यानंतर बराच वेळ ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या कुटूंबियांनी तिचा घराच्या आजुबाजुला, मैत्रिणींकडे, नातेवाईकांककडे तसेच शहरात विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe