Ahmednagar News : पती पासून अलिप्त राहणार्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. याप्रकरणी पीडितीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या तरूणासह पळवून जाण्यास मदत करणार्या तरूणाच्या बहिण व मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल लक्ष्मण गायकवाड, त्याची बहिण संगीता बर्डे व मेहुणा रवीद्र बर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी नगर तालुक्यातील एका गावात राहणार्या असून त्यांचा विवाह कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीसोबत झाला आहे.
दरम्यान गेल्या तीन वर्षापासून त्या त्यांच्या मुलासह पतीपासून अलिप्त राहत आहे. सध्या कामानिमित्त नगर शहरात एका ठिकाणी राहतात. तेथेच त्यांची विशाल सोबत ओळख झाली होती. त्याने फिर्यादीला लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला.
तसेच त्याची बहिण संगीता व मेहुणा रवींद्र यांनी लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून जाण्यास मदत केली. पळवून गेल्यानंतर विशाल याने फिर्यादीवर कल्याण येथील भाडोत्री खोलीत अत्याचार केला. दरम्यान तेथून पीडिता नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.