Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील प्रसिद्ध व्यापाराच्या घरावर हत्यारबंद दरोडा टाकायला हत्यारे घेऊन दरोडेखोर घुसले, त्यानंतर…

Published on -

अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक भागात दरोडे, चोरी आदी घटना सातत्याने सुरु असून यांना आता पोलिसांचा धाक उरलेला नाही का असा प्रश्न पडायला लागलाय. आता नगर शहरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरावर हत्यारबंद दरोडा टाकायला ५ दरोडेखोर आल्याचे वृत्त अन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.२२ मार्चला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पहाटे ही घटना घडली.

आधी माहिती अशी : शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील साईनगर येथे श्रीकांत चंगेडीया हे व्यापारी राहतात. त्यांच्या बंगल्यात दरोडा टाकण्यासाठी २२ मार्चला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ५ दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे चाकू, लोखंडी गज, टामी, कटरसारखी हत्यारे होती. बंगल्याची सुमारे १० फुट उंच असलेल्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून या दरोडेखोरांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. सर्वांनी हुडी असलेले टी-शर्ट घातलेले होते. तोंडाला मास्क बांधलेले होते.

सर्वांच्या हातात हातमोजे आणि पायात स्पोर्ट्सचे शूज होते.
हे दरोडेखोर बंगल्याच्या आवारात कानोसा घेत वावरत असताना कशाचा तरी आवाज होवून त्यांची चाहूल लागून चंगेडीया कुटुंबीय झोपेतून जागे झाले. त्यांनी सीसीटीव्हीत पाहिले असता त्यांना बंगल्याच्या आवारात दरोडेखोर वावरताना दिसले. त्यांनी शेजारी राहणाऱ्या काहींना फोन करून चोरटे आल्याची माहिती दिली. काही वेळातच परिसरातील अनेक जण जागे झाले आणि त्यांनी सर्वांनी एकाच वेळी चोर चोर असा आरडा ओरडा सुरु केला.

सर्व बाजूने झालेला आरडाओरडा ऐकून दरोडखोर बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून अंधारात पसार झाले.
दरम्यान, आम्हाला जर आवाज आला नसता तर आमच्या घरात एखादी मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने कुठली घटना घडली नाही. शेजारी असणाऱ्या नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे चोर पळून गेले. हे सर्व पूर्वनियोजित असल्यासारखे वाटत असून, पोलिसांनी तातडीने तपास करून दरोडेखोरांना अटक करावी, अशी मागणी योगेश चंगेडिया यांनी केली आहे.

कार पोलिसांच्या ताब्यात
हे दरोडेखोर एका विनाक्रमांकाच्या मारुती इको कार मधून आले होते. ती कार त्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस अंधारात उभी केलेली होती. मात्र पळून जाताना त्यांनी कार तेथेच सोडून दिली. पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली असून त्यात दरोड्यासाठीची काही हत्यारे आढळून आली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe