अहमदनगर ब्रेकिंग ! कारागृह फोडून पळालेले चारही आरोपी ताब्यात नेपाळला जाण्याची होती तयारी? धक्कादायक माहितींचा होणार उलगडा

Published on -

संगमनेर येथील कारागृहातून विविध जबर गुन्ह्यातील चार आरोपी काल 8 नोव्हेंबर रोजी कारागृहाचे गज कापून फरार झाले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

तसेच पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. परंतु आता अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने हे सर्व आरोपी तीस तासांत पकडले आहेत. हे आरोपी व त्यांना मदत करणारे दोघे ते सहा आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून ताब्यात घेतले आहेत.

राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबु ढाले, मच्छिंद्र मनाजी जाधव असे या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी पसार झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर याना या गुन्ह्याचा तपास करण्याचा व आरोपीना शोधून ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार आहेर व पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करत त्यावरून माग काढत या आरोपीना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून ताब्यात घेतले. हे आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते असे प्राथमिक माहितीत समजते.

या आरोपींनी त्यांच्यावर असणाऱ्या गुन्ह्यात जास्तीत जास्त शिक्षा होईल या धास्तीने तेथून पळ काढला होता. यांच्या एका साथीदाराचे नेपाळ कनेक्शन असल्याने समजते.तेथेच त्यांना जायचे होते.

परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वेळेत जामनेर येथे पोहोचले. तेथून त्यांना ताब्यात घेतले. आता हे आरोपी पळाले कसे ? त्यांना कोणी मदत केली होती का? आदी अनेक प्रश्न समोर आले आहेत. व याची उत्तरे आता लवकरच मिळतील.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण,

पोकॉ अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चापोहेकॉ उमाकांत गावडे व चापोहेकॉ संभाजी कोतकर व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ जायभाय आदींच्या पथकाने केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News