अहमदनगर ब्रेकिंग : एस.टी.च्या धडकेत वृध्द जागीच ठार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात एका वृध्दाचा मृत्यु झाला.

बसस्थानकावर उभ्या असलेल्या वृध्दाला अहमनगर-नाशिक (क्रमांक एमएच 06 एस 8464) या बसची धडक बसून ते चाकाखाली सापडले.

यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. नामदेव चतरू जाधव (वय 76, मु.पो.ठाकर, शनीचे राक्षसभवन, ता.गेवराई, जि.बीड) असे मयताचे नाव आहे.

अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe