अहमदनगर ब्रेकींग: पोलिसाने केला तरूणीवर अत्याचार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Rape News :- येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार किरण कोळपे याने तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी त्याच्यासह नातेवाईकांविरूध्द अत्याचार, फसवणूक आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण ईस्ट, ठाणे येथे राहणार्‍या तरूणीने फिर्याद दिली आहे.

पोलीस अंमलदार कोळपे, आशाबाई कोळपे, तिचा भाऊ सिताराम, त्यांचा एक नातेवाईक उत्तम, आशाबाईच्या मामाचा मुलगा भारत (पूर्ण नाव माहिती नाही, रा. विळद ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

जुन 2006 ते जानेवारी 2022 दरम्यान ही घटना घडली असल्याचे पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आशाबाई कोळपे, तिचा भाऊ सिताराम, नातेवाईक उत्तम व भारत यांनी संगमताने मला 2006 मध्ये गाडीतून प्रवास करीत असताना पिण्याच्या पाण्यातून औषध देवुन सांताक्रुझ येथे नेले.

तेथे अश्‍लिल फोटो काढले. तसेच किरण कोळपे याने जबरदस्तीने शारिरीक संबंध करून अश्‍लिल फोटो काढले आहेत. किरण कोळपे याने वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संंबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe