Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये होमगार्ड पथकाच्या ट्रॅव्हल बसवर दगडफेक, एक जखमी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar Breaking : सध्या देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरीता गेलेले होमगार्ड हे छत्रपती संभाजीनगर येथे परतत असताना त्यांच्या ट्रॅव्हल बसवर कोपरगाव तालुक्यातील समृद्धी मार्गावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली.

यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून यात बसचे नुकसान झाले आहे. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी : सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सैनिक यांना बंदोबस्त करता एका ठिकानाहून दुसऱ्या ठिकाणी ने आन करावी लागत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक बंदोबस्ताच्या अनुशंगाने छत्रपती संभाजीनगर येथून ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरीता आलेले 42 होमगार्ड यांना

ठाणे येथून छत्रपती संभाजीनगर येथे सोडविण्याकरीता ट्रॅव्हल बसमधून चालेले होते. परंतु रात्री (22 मे) साडेबारा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पूल, समृध्दी हायवे रोडवर, कोपरगांव येथे अज्ञात इसमांनी ट्रॅव्हल बसच्या समोरील काचवर दगडफेक केली.

बसचे नुकसान केले असून या घटनेत बस चालक आश्पाक युसूफ शेख (वय 37 वर्षे) हे जखमी झाले आहे. या प्रकरणी आश्पाक युसूफ शेख यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात इसमां विरोधात भा.द.वि. कलम 336,337,427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हल्लाखोरांचा शोध घेत आहे.

लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बसवर दगडाने हल्ला होणे हा गंभीर प्रकार आहे. हा हल्ला कोणी केला, कशासाठी केला, यामागे नेमके काय कारण होते याचा तपास आता पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe