अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचे कपडे फाडून केली बेदम मारहाण !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  पारनेर शहरातील सोबलेवाडी येथे शेतकरी कुटुंबातील महिलेचे कपडे फाडून मारहाण करण्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करताना कपडे फाडल्याची तक्रार पीडितेने केली. मात्र, या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

तालुक्यात वाढलेल्या गुन्ह्यांच्या व महिला अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे समजते.

गंभीर गुन्ह्यांची संख्या करण्यासाठी गुन्हे दाखल करण्याऐवजी गुन्हे दडपण्याचे प्रकार पारनेर पोलिसांकडून सुरू झाले आहेत.

शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडित महिला तिच्या घरात झोपलेली असताना लक्ष्मण भाऊ कावरे, योगेश रघुनाथ म्हस्के व योगेश म्हस्के यांच्या पत्नीने पीडित महिलेला घरातून बाहेर बोलावले.

भाऊबंदकीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण करीत योगेश म्हस्के यांच्या पत्नीने पीडितेच्या अंगावरील कपडे फाडले, अशा आशयाची तक्रार पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात दिली.

या फियार्दीवरून आरोपींच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी घटनेचे आणि गुन्ह्याचे गांभीर्य कमी केले.

पारनेर पोलिसांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात पीडित महिला व तिचे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News