अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagarlive24:- राहुरी तालुक्यातील बारागांव नांदुर येथील विशाल विठ्ठल पवार वय २२ या तरुणाने गुरुवारी रात्री जिल्हा परिषद शाळेच्या छताला ओढणीच्या सहाय्याने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, कृष्णा विघे, सुनील चव्हाण, पोलिस पाटील अशोक पवार अदिंनी धाव घेऊन युवकाला खाली उतरवले युवकाचा मृतदेह

Breaking news. World news with map backgorund. Breaking news TV concept. Vector stock.
शवविच्छेदनासाठी राहुरी येथे आणण्यात आला होता. विशाल पवार या तरुणाने नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजू शकले नसून त्याच्या पश्चात पत्नी १ मुलगी, आई असा परिवार आहे. घटनेचा तपास राहुरी पोलीस करत आहे.