अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Ahmednagar news :- बंधन बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली. दरम्यान महिलेने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी त्या चोरट्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले.
बुधवारी सकाळी कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे ही घटना घडली. सोमनाथ रंगनाथ अडागळे (वय 32 रा. संभाजीनगर, नेवासा फाटा, हल्ली रा. भंडारी चौक, भूषणनगर, केडगाव) असे आरोपीचे नाव आहे.
सुरेखा सुरेश पेगडवार (वय 54 रा. रविश कॉलनी, कायनेटीक चौक) यांनी कोतवाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अडागळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजणच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती पेगडवार यांच्या घरी गेला व बंधन बँकेचा अधिकारी असल्याचे आणि त्याला रूम भाड्याने हवी आहे अशी त्याने विचारणा केली होती.
त्यानंतर बुधवारी सकाळी पेगडवार यांची मुलगी नेहमीप्रमाणे दुकानावर गेलेली असताना व पेगडवार घरामध्ये असताना आरोपी घराचा दरवाजा ढकलून आत गेला व त्याने पेगडवार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढन चोरुन नेली.
पेगडवार यांनी आरडाओरड केल्यावर कॉलनीतील लोकांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर आरोपीला कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पेगडवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.