Ahmednagar News : काळीज हेलवणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका युवकाचाच विचित्र अवस्थेत मृतदेह आढळला आहे. दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय ३६) असे या युवकाचे नाव आहे. घातपात करून मारल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.
अधिक माहिती अशी : संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून दिलीप सोनवणे हा युवक बेपत्ता झाला होता. या बेपत्ता युवकाचा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
दिलीप भाऊसाहेब सोनवणे असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिसाना समजली. बुधवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी ही घटना उघडकीस आली असून या मृत युवकाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून झाकून ठेवलेला होता.
दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस
ही घटना कधी घडली, मृतदेह कुणी कसा फांद्यांनी झाकून ठेवला याची कुणाला कल्पनाही नव्हती. मात्र जेव्हा या मृतदेहाची दुर्गंधी सुटली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला व घटना उघडकीस आली.
सकाळी गावातील व्यक्ती या परिसरात आलेली होती तेव्हा त्यास दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने आसपास पाहणी केली. तेव्हा त्याला परिसरातच लिंबाच्या झाडाच्या फांद्यांच्याखाली दाबलेल्या अवस्थेत मृतदेह दिसल्याने ही घटना उघडकीस आली.
तपासाचे आवाहन
पोलिसांसमोर आता तपासाचे आव्हान आहे. हा घातपात असल्याचा प्राथमिक संशय त्यांना आहे. त्यामुळे आता सर्वच गोष्टी बारकाईने पाहत तपासणी करण्याचे आवाहन त्यांच्यापुढे असणार आहे.