Ahmednagar News : तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे नगर- मनमाड मार्गालगत असलेल्या तनपुरे पेट्रोल पंपानजिक एका पुलाखाली एका ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला. शिर्डीजवळील सावळीविहीर येथील सचिन नानासाहेब वाणी असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते.
नगर- मनमाड महामार्गावरील तनपुरे पेट्रोल पंपानजिक असलेल्या फुलाखाली काही नागरिकांना कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे,

Ahmednagar News
सहाय्यक उपनिरीक्षक तुळशीदास गिते, सोमनाथ जायभाय, रवींद्र कांबळे, अंबादास गिते, जयदीप बडे आदींनी तेथे धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या व्यक्तीचा मृत्यू होऊन सात ते आठ दिवस झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.