Ahmednagar News : कॉलेजमधल्या मुलाकडून दुसऱ्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ काढून उकळले ४० हजार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News :  अहमदनगर शहरातून विविध गुन्हेगारी घटना समोर येत असतानाच आता एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या काही घटना ताजा असतानाच आता अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलासोबत केलेल्या या अनैसर्गिक कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. ते व्हायरल करण्याची धमकी देत ४० हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला पीडित अल्पवयीन मुलाने याप्रकरणी रविवारी (२ जून) तोफखाना ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नैसर्गिक कृत्य करून चित्रिकरण करणाऱ्या मुलाविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलगा शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आरोपी मुलासोबत त्याची ओळख आहे. १ ऑक्टोबर २०२३ रोजी ते दोघे सावेडीतील दुकानात गप्पा मारत होते.

त्यावेळी आरोपी मुलगा फिर्यादीला म्हणाला, ‘चल आपण माझ्या घरी जाऊन येऊ’, तेव्हा फिर्यादी त्याच्यासोबत गेला असता त्याचा दारू पिल्याचा वास येत होता. ते दोघे रात्री ११ वाजता घरी गेले. सोफ्यावर गप्पा मारत असताना आरोपी मुलगा फिर्यादी जवळ आला व त्याने अनैसर्गिक कृत्य केले.

त्यावेळी त्याच्या हातात मोबाईल होता. त्याचा हा प्रकार पाहून फिर्यादीने त्याला ढकलून दिले व तो घरी गेला. दरम्यान, १५ दिवसानंतर फिर्यादी मुलगा कॉलेजला गेला असता आरोपी मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये अनैसर्गिक कृत्य केल्याचे चित्रिकरण दाखवले.

चित्रिकरण व्हायरल न करण्यासाठी ४० हजाराची मागणी केली. फिर्यादीने त्याला ४० हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपी फिर्यादीला धमकी देत होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe