Ahmednagar News : अहमदनगर दोन घटनांनी हादरले ! शाळकरी मुलीचे अपहरण तर उधार नाष्टा न दिल्याने कत्तीने मारहाण..

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्हेगारी घटना दररोज घडताना दिसत आहेत. आता दोन वेगवेगळ्या घटनांनी अहमदनगर हादरले आहे. एका घटनेत उधार नाष्टा दिला नाही म्हणून हॉटेल चालकास कत्तीने मारून जखमी करण्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडलाय.

याबाबत बाळासाहेब कचरू पारखे (वय-४६) यांचा नाष्टा सेंटर नावाचा हॉटेलचा व्यवसाय आहे. दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. विनायक पाळदे हा तेथे आला व त्याने नाष्टा केला. नाष्टा झाल्यावर ८० रूपये बिल त्याला मागितले असता तो म्हणाला की, माझ्याकडे पैसे नाहीत.

तेव्हा मी उधार देत नाही, तू आत्ताच पैसे दे, असे म्हटल्याचा राग आल्याने पाळदे याने तोंडावर जोरात ठोसा मारला आणि कंबरलेला असणारी कत्ती काढून आपल्या गालावर मारली. त्यामुळे मोठी जखम झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी विनायक पाळदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या एका घटनेत शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. १३ वर्षे वयाच्या शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार नेवासा फाटा परिसरात घडला आहे. सदर मुलीच्या आईने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. आपली मुलगी ही इयत्ता ७ वीत शिकते.

ती १३ फेब्रुवारीला सकाळी ९.३० ला शाळेत जाते असे सांगून घरातून गेली होती. मात्र, दुपारी ४ वाजले तरी ती घरी न आल्याने ५ वा. आपण तिच्या वर्गशिक्षिकेला फोन केला असता त्यांनी सांगितले की, तुमची मुलगी ही आज शाळेत आली नाही.

त्यानंतर आपण आपल्या मुलीचा नातेवाईक तसेच इतर मैत्रिणींकडे शोध घेतला असता ती न सापडल्याने कोणीतरी तिचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe