अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हत्याराने वार करून अडीच लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी शहरातील जुन्या कोर्टाजवळील हिमगिरी बिल्डींगसमोर घडली.
याप्रकरणी सतीश उर्फ बाळासाहेब नारायण नरोटे (रा. चितळे रोड, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरोटे हे भाजीपाला विक्रेते आहेत. सध्या त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नरोटे यांनी रूग्णालयात उपचार घेत असताना कोतवाली पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. त्यावरून तीन अज्ञात तीन चोरट्यांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलिस निरीक्षक संपत शिंदे पथकासह घटनास्थळी आले. सोमवारी सकाळी सतीश नरोटे त्यांच्या दुचाकीवरून जात होते.
त्यावेळी विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना जुन्या कोर्टाजवळ अडवले. नरोटे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तिघांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी विरोध केला म्हणून चोरट्यांनी त्यांच्याकडील धारदार हत्याराने नरोटे हातावर वार केले. नरोटे जखमी होताच चोरटे चैन घेऊन पसार झाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम