पोहेगाव येथे सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा ! नागरीकांनी दरोडेखोरांना पकडले…

Sushant Kulkarni
Published:

२२ जानेवारी २०२५ पोहेगाव : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी माळवे सराफ दुकानावर दरोडा टाकून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.मात्र नागरीकांच्या सावधानतेमुळे त्यांचा प्लॅन फसला व नागरीकांनी दरोडेखोरांना पकडून चोप दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सहा वाजता रस्त्यावरून तीन तलवारधारी तरुणांनी रस्त्यावर नागरीकांना तलवारी दाखवत दहशत निर्माण करून माळवे सराफ यांच्या दुकानात प्रवेश करून माळवे यांच्या पत्नी यांना तलवारीचा धाक दाखवत दुकानातील सर्व ऐवज त्यांनी एका खोक्यात भरला असता व पळून जाण्याच्या तयारीत असतानाच माळवे यांनी एका चोराला पकडून ठेवले.

त्यातच आजूबाजूच्या नागरिकांनी दगड मारायला सुरुवात केल्यामुळे दुसरा चोर त्या पकडलेला चोराला सोडवण्यासाठी गेला व त्यांनी माळवे यांच्यावर तलवार उगारून त्याची सोडवणूक केली आणि तेथून ते घेतलेला अवस्था सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आजूबाजूच्या नागरीकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले व त्यांना बेदम चोप दिल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe