आरोपीस पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्यास रस्त्यावरून नेले फरफटत …?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News:पोलिसांचे नाव घेतले तरी गुन्हेगार थरथर कापतात हा आजवरचा अनुभव आहे. मात्र नुकतीच एका वाँरटमधील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण केली.

तसेच पळुन जाणाऱ्या आरोपीच्या मोटारसायकलला पाठीमागुन पकडणाऱ्या पोलिसाला तसेच फरफटत नेल्याची सिनेस्टाईल मात्र धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे.

या हल्यात पोलिस कर्मचारी आकाश चव्हाण हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी अफजल पठाण याच्यासह पाच जणाविरु्दध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी अफजल पठाण याला माळशिरस न्यायालयाचे पकड वाँरट होते.

वाँरंट बाजवणी करणारे पोलिस कर्मचारी आकाश चव्हाण व पोलिस कर्मचारी अंगारखे यांना गुप्त बातमीदाराकडुन सदरचे आरोपी हे माणिकदौंडी येथे असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार हे दोघेजण त्या ठिकाणी गेले असता हाँटेल मित्रप्रेम समोर अफजल पठाण दिसला. त्याला आकाश चव्हाण याने सांगितले की तुम्हाला वाँरट आहे.

त्याचा राग आल्याने तुम्ही माझ्याकडे येऊ नका नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली व पठाण हा मोटारसायकलवरु बसुन पळुन जावु लागला असता त्याच्या मोटारसायकलला पाठीमागुन आकाश चव्हाण यांनी पकडले. परंतु पठाण याने मोटारसाकल तशीच पुढे नेली.

विस ते पंचवीस मीटर चव्हाण यांना रस्त्यावरुन फरफटत नेले ते जखमी झाले. पुढे अतिक अपजल पठाण, अशोक छोटेखाँ पठाण, रमीज अकबर पटेल व एक अनोळखी यांनी चव्हाण यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला.

अंगारखे यांनी चव्हाण यांना सोडविले. यावेळी अफजल पठाण पळुन गेला. पोलिस कर्मचारी चव्हाण यांच्या तक्रारीवरुन अफजल पठाण व इतर चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe