Ahmednagar Crime : जीवे मारण्याचा प्रयत्न, ७ जणांवर गुन्हा दाखल !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सोनई येथे गावात मोटरसायकलवर जात असताना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी नामदेव कोरडे यांच्या फिर्यादीवरून सोनई येथील ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नामदेव अशोक कोरडे यांनी म्हटले आहे की, (दि. २०) फेब्रुवारी रोजी मित्रांबरोबर गावात जात असताना वैभव वाघ, सचिन पवार, सचिन वैरागर, अभिषेक त्रिभूवन, गणेश वैरागर, बापू वैरागर, दादासाहेब वैरागर (सर्व, रा. सोनई)

यांनी रस्त्यात अडवून त्यांच्या हातातील तलवार, लोखंडी गज, लाकडी दांडा, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, गलोल, अशा हत्यारांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केली.

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन ओढून गेली, अशी फिर्याद हॉस्पिटल मधून जबाबावरून घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फिर्यादी नामदेव कोरडे, संदीप काळे, सोमनाथ लांडे हे जखमी झाले आहेत.

या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मेढे पुढील तपास करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe