Ahmednagar Crime : सोनईत मारहाण ! गडाख परिवारात परस्परविरोधी गुन्हे दाखल

Published on -

Ahmednagar Crime : सोनई येथील कन्हेरवस्ती रस्त्यावर (दि.६) ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या मारहाण प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे नुकतेच दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सोनई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली फिर्याद संतोष भाऊसाहेब गडाख ( वय ३४, रा. कन्हेरवस्ती) यांनी दिली की. (दि.६ ) रोजी सायंकाळी घरगुती कामासाठी सोनई गावात जात असताना पांढऱ्या रंगाची कारगाडी माझ्या मोटरसायकलला आडवी लावून खाली उतरून गैरकायद्याची मंडळी जमवून लाथा बुक्क्याने तसेच लाकडी दांड्याने व कंबरेच्या बेल्टने मारहाण केली व पोलीस ठाण्याला आमची तक्रार दिल्यास जीवे ठार मारून टाकू, असा दम दिला.

या फिर्यादीवरून अनिल सोपान गडाख, बाळासाहेब दत्तात्रय गडाख, बाबासाहेब एकनाथ गडाख, विशाल नामदेव निमसे, रवींद्र रामदास सोनवणे, गणेश सोपान गडाख या सहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र लबडे पुढील तपास करत आहे

दुसरी फिर्याद रवींद्र रामदास सोनवणे (वय २७, रा. बेल्हेकरवाडी) यांनी दिली की, (दि. ६) रोजी सायंकाळी कन्हेरवस्ती जवळील चारीजवळ उभा असताना सतिष गडाख (पूर्ण नाव माहित नाही) हा तेथे आला व जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe