अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी झेंडी गेट परिसरात गोमांस विक्री करणार्या दुकानावर छापा टाकला. याठिकाणी सहा हजार रूपये किंमतीचे 40 किलो गोमांस मिळून आले.(Ahmednagar Crime news)
पोलिसांनी ते गोमांस जप्त केले असून एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलीस हवालदार अमोल गाडे यांनी फिर्याद दिली आहे. झेंडीगेट परिसरात एक जण गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.
त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार वाय. ए. भिंगारदिवे, सागर पालवे, ए. पी. इनामदार, एस. यु. गोमसाळे, दीपक रोहकले यांना कारवाई करण्याचे सांगितले. उपनिरीक्षक इंगळे यांच्या पथकाने कारवाई करत गोमांस जप्त केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम