११ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील वळण परिसरातील मुळा नदी पात्रात एका विवाहित इसमाचा मृतदेह आढळून आला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आदिनाथ बाळासाहेब आढाव, वय ४०, रा. वळण असे मृताचे नाव आहे. इसमाने मुळा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
आदिनाथ बाळासाहेब आढाव हे शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांची मोटार सायकल वळणच्या मुळा नदी जवळील अमरधाम येथे आढळून आली होती. राहुरी पोलिसात आदिनाथ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सोमवारी सकाळी वळणच्या मुळा नदी पात्रात त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना काही नागरिकांना आढळून आला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-63.jpg)
गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस हवालदार अशोक शिंदे, दीपक फुंदे, दिगंबर सोनटक्के यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. मृत अदिनाथ आढाव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.