११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील सिद्धार्थनगर परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी व १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा असे दोघांचे अपहरण केल्याच्या २ वेगवेगळ्या घटना ८ व ९ फेब्रुवारी रोजी घडल्या आहेत.याबाबतची माहिती अशी की, लाल टाकी परिसरातील सिद्धार्थनगर, साठे चौकातील बंगल्यासमोर ८ फेब्रुवारीला संध्याकाळच्या वेळेस खेळणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलास एका इसमाने फूस लावून त्याचे अपहरण केले.
याप्रकरणी अपहृत मुलाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या घटने पाठोपाठ सिद्धार्थ नगर परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्रीच्या वेळी कुटुंबासह झोपलेली असताना ९ फेब्रुवारीला पहाटे बाथरूमला गेली ती पुन्हा माघारी आली नाही.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-75.jpg)
त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही.यावरून या मुलीचे अपहरण केले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली.यावरुन पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याची नोंदणी केली.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम श्रीवास्तव या करीत आहे.