सोलर प्लान्टमधून तब्बल सात लाख रुपये किमतीची केबल केली लंपास

Sushant Kulkarni
Updated:

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे,जामखेड तालुक्यात सोलर प्लान्ट मधून चक्क पावणेसात लाख रुपयांची कॉपर केबल चोरी केली आहे.

मोहरी परीसरात असलेल्या पॉवर सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी पावणेसात लाख रुपयांची सत्तावीस हजार मीटर लांबीची कॉपर केबल चोरुन नेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा ते जातेगाव रोडवरील मोहरी परीसरात गेल्या अनेक वर्षापासून पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा उर्जा निर्मितीचा प्लांट आहे.या ठिकाणी दि १७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात चोरटे आले व त्यांनी या ठिकाणी ओ २ पॉवर डिसी केबल, २७ हजार मीटर तांब्याची तार असलेले केबलचे २७ ड्रम रोल आशी एकुण ६ लाख ७५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरुन नेली.

या प्रकरणी सिक्युरिटी गार्ड दत्ता रामा बारगजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी भेट दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe