शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  राहुरी तालुक्यात बेकायदेशीर पणे सावकारकी करून पठाणी व्याज वसूल करण्यात आले. तसेच व्याजाची रक्कम दिली नाही म्हणून ज्ञानदेव शेळके यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

त्यामुळे राहुरी पोलिसात तालुक्यातील गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी पाच खाजगी सावकारां विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. ज्ञानदेव विठ्ठल शेळके वय ५९ वर्षे राहणार मानोरी.

तालूका राहुरी. हे मानोरी येथील धान्य वाटप सोसायटीत नोकरी करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेतून बचावले.

ज्ञानदेव शेळके यांनी सुमारे दहा वर्षापूर्वी आरोपी आण्णासाहेब भागवत वाकचौरे, बबन गोपीनाथ थोरात, चंद्रकांत बबन थोरात, बन्सीभाई वजिर शेख, शंकर कारभारी पोटे सर्व राहणार मानोरी ता. राहुरी. यापैकी आण्णासाहेब चाकचौरे याचेकडून दोन लाख रूपये,

बबन थोरात याचेकडून साडेतीन लाख रुपये, बन्सीभाई शेख याचेकडून एक लाख रुपये तसेच शंकर पोटे याचेकडून पन्नास हजार रुपये असे एकूण सात लाख रूपये व्याजाने घेतले होते. या पाच सावकारांनी गेल्या दहा वर्षांत ज्ञानदेव शेळके यांचेकडून मुद्दलीच्या दोन ते तीन पट जास्त रक्कम व्याज म्हणून वसूल केली.

नंतर ज्ञानदेव शेळके हे व्याजाचे पैसे देत नाही या कारणावरून आरोपी सावकारांनी शेळके यांच्याकडे वेळोवेळी तगादा लावला. पैसे दिले नाहीतर गाई ओढून घेवून जावू,असा दम दिला.

तसेच शेळके यांनी आत्महत्या करावी. म्हणून आरोपींनी व्याजाच्या पैशाची मागणी फिर्यादीस वेळोवेळी करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे ज्ञानदेव शेळके यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्यावर नगर येथील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानदेव शेळके यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलिसांत ५ जणां विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe