९ जानेवारी २०२५ पाथर्डी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच ओबीसी समाजाविरोधात परभणी येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.पाथर्डीतील आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात आंदोलकांनी गर्दी केली.अखेर पोलिसांनी आव्हाड यांच्या फिर्यादीवरून जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
शनिवारी (दि. ४) सकाळी १० वाजता परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चा व सभेवेळी मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले.विशिष्ट समाजाला लक्ष्य करून जरांगे यांनी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला,असे फिर्यादीत आहे.