अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या कट रचून दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख सुरेश रणजित निकम, (रा. कात्रड, ता. राहुरी) व त्याच्या टोळीतील पाच जणांविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला २२ सप्टेंबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी मिळाली आहे.
टोळीप्रमुख व टोळीतील सदस्य – सुरेश रणजित निकम (वय २८ वर्ष, रा. कात्रड, ता. राहुरी, करण नवनाथ शेलार (वय १९ वर्षे, रा. विटभटटीजवळ, मोरे चिचोरे, ता. नेवासा),
विकास बाळू हनवत (वय २४ वर्षे, रा. पाण्याची टाकीजवळ, कात्रड, ता. राहुरी), सागर शिवाजी जाधव (वय ३० वर्ष, रा. कात्रड, ता. राहुरी), सतिष अरुण बर्डे (वय २८ वर्ष, रा. कात्रड, ता. राहुरी). या टोळीविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचे दोन,
सोनई पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा एक, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असल्यास भारतीय हत्यार कायदाप्रमाणे, सोनई पोलिस ठाण्यात दरोडा टाकून जीवे मारण्याची धमकी देणे, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोडा व जबरी चोरी, बळजबरीने घरात घुसून चोरी करणे,
या कायद्यानुसार सात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे कट करुन व संगनमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करुन केलेले आहेत.
त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम