Ahmednagar Crime : समाजात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत आहेत. समाजात पती पत्नी हे अत्यंत पवित्र नाते मानले जाते. परंतु या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली.
पोलिस ठाण्यासमोरच पती-पत्नीत हाणामारी झाली. पती-पत्नीच्या वादात मुलीचा ताबा कुणाकडे या कारणावरून ही हाणामारी झाली. ११ एप्रिलला सोनई पोलिस ठाण्यासमोरच ही घटना घडली.

सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपापसात हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. या दाखल फिर्यादीवरून नीलेश ज्ञानेश्वर घुले, वय ३६, संतोष शिवाजी मोडवे, वय ३६, दोघेही रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे, गोरख निवृत्ती खामकर, वय ४०, रा. श्रीरामपूर,
उज्ज्वला संतोष कुमठेकर, वय ३०, रा. वाघ वस्ती सोनई, सीताबाई दिलीप मेहलडा, वय ५०, रा. ओतूर, संतोष जगन्नाथ कुमठेकर, वय ३६, रा. वाघ वस्ती सोनई,
गोरक्षनाथ जनार्धन कुमठेकर, वय ३४, रा. सदर, रुक्मिणीबाई जनार्दन कुमठेकर, वय ५० यांच्याविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. मुलींच्या ताबाप्रकरणी फिर्याद दाखल न होता, सार्वजनिक शांततेचा भंग ही फिर्याद पोलिस प्रशासनाने दाखल केली. वाद मिटवण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. परंतु हस्तेक्षेपानंतर वातावरण लगेच निवळले. पोलिसांनी वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.