अहमदनगरच्या बोगस आर्किटेक्टवर दिल्लीत गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Crime news :- अहमदनगर शहरातील आर्किटेक्ट यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून कौसिंल ऑफ आर्किटेक्चरचे रजिस्ट्रेशन मिळविल्यामुळेे त्यांच्यावर लोदी रोड नवीदिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

ओम मुकुंदराव नगरकर ऊर्फ ओम गवळी असे गुन्हा दाखल झालेल्या आर्किटेक्टचे नाव आहे. ओम नगरकरांनी आर्किटेक्चर पदवीला प्रवेश न घेता परिक्षा पास झाल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून 2020 मध्ये कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर या शिखर संस्थेचे रजिस्टेशन प्राप्त केले.

परंतु द इन्डियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्चरच्या अहमदनगर सेंटरने यावर आक्षेप घेतला. सदर व्यक्तीने सादर केलेले सर्व कागदपत्रे बनावर असल्याचे पुरावे त्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरला सादर केले.

त्यानुसार कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने ओम नगरकर यांचे रजिस्ट्रेशन तातडीने गोठविले आणि त्यांना मुळ प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश दिले.

ओम नगरकरांनी मुळ कागदपत्रे दाखल न केल्यामुळे शेवटी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने ओम नगरकराविरूद्ध बनावट कागदपत्रे सादर करून कौन्सिलची फसवणूक केल्याचा गुन्हा लोदी रोड पोलीस स्टेशन, नवी दिल्ली येथे दाखल केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe