३ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असून, चोऱ्या व अपहरणाच्या गुन्ह्यांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात असताना बहुतांश चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.या गुन्ह्यांच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
श्रीगोंदा तालुका क्षेत्रफळाने मोठा असल्याने तालुक्यात श्रीगोंदा व बेलवंडी अशी दोन स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत. यापैकी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सन २०२४ मध्ये खून, दरोडा, चोरी, पळवून नेणे यासारखे ७०३ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ५८५ गुन्हे उघड करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे.
यात अपघात, पळवून नेणे, चोरी, भाग १ ते ५ प्रकरणातील ११८ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.२०२३ च्या तुलनेत जवळपास दुप्पट घरफोड्या झाल्या आहेत. दिवसा झालेल्या ५ घरफोड्यांपैकी एकाचाही तपास लागलेला नाही.तर रात्रीच्या वेळी झालेल्या २२ घरफोड्यांपैकी केवळ चारच घरफोड्यांचा तपास लावण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे.
सरत्या वर्षात दोन दरोडे पडले असून, पोलिसांनी दोन्हींचा तपास लावला आहे. एकूणच, सरत्या वर्षात दरोडा, जबरी चोरी व घरफोड्यांचे ३४ गुन्हे दाखल झाले आहेत, यापैकी केवळ ९ गुन्ह्यांच्या तपासात श्रीगोंदा पोलिसांना यश विनयभंगाचे ७ गुन्हे दाखल होऊन त्यांचा तपासात पोलीस यशस्वी झाले आहेत.
बलात्काराच्या दाखल १० गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलीस यशस्वी झाले. पळवून नेण्याच्या ३० घटना घडल्या असून, त्यापैकी २४ गुन्ह्यांच्या तपासात पोलीस यशस्वी झाले आहेत. सन २०२३ मध्ये पळवून नेण्याचे २० गुन्हे दाखल होते, त्यापैकी १९ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले होते. बलात्काराचे ११ तर विनयभंगाचे २७ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना कामाचा ठसा उमटविणे गरजेचे आहे.
२०२४ मधील गुन्हे : दाखल संख्या : उघड संख्या
खून १/१, खुनाचा प्रयत्न – ११/११, बलात्कार ११/११, विनयभंग – २७/२७, दरोडे – २/२, घरफोड्या २७/४, जबरी चोरी- ५/३, सर्वचोरी-८३/२२, पळवून नेणे ३०/२४, भाग १ ते ५ – २८८/ २७२ यांचा समावेश आहे.