गुन्ह्यांच्या तुलनेत शोध नगण्यच; आक्रमक गावकरी सोमवारी चांदा बंद ठेवणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खून, दरोडे, चोऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असून पोलीस प्रशासन तपासात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान याच्या निषेधार्थ चांदा येथील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्यावतीने सोमवार दि. 7 मार्च रोजी बाजार तळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले असून

यावेळी संपूर्ण चांदा गावही बंद राहणार आहे. या संदर्भात शनिवारी चांदा ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.

यावेळी चांदा येथे अनेक दिवसापासून सुरु असलेल्या गंभीर गुन्ह्याप्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याबद्दल सर्वानीच तीव्र नाराजी व्यक्त केली.

परिसरात चोर्या, गुन्हेगारी वाढत असताना मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत कुठल्याही घटनेचा तपास लागला नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार द्यायलाही ग्रामस्थ तयार होत नसल्याची खंत बैठकीत व्यक्त केली.

परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. चांदा आणि परिसरात शेतकरी आणि ग्रामस्थ भयावह झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुचना

देऊन चांदा परिसरातील नागरीकांच्या सुरक्षेसाठी रात्री विशेष पथक नेमून गस्त वाढवावी, चांदा येथे स्वतंत्र पोलीस चौकी द्यावी अशा आशयाचे निवेदन गृहमंत्र्यांना देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe