१० फेब्रुवारी २०२५ शेवगाव : येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या नामांकित डॉक्टरच्या पत्नीने राहत्या घरी खोलीचे दार आतून लावून छताच्या हुकाला साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ७) घडली. याप्रकरणी डॉक्टरच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सायली सुशील कबाडी (वय ३३, रा. सिद्धिविनायक कॉलनी, शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.मृत महिलेचे वडील चंद्रकांत हरिश्चंद्र परब यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. सुशील जगन्नाथ कबाडी, सासरा जगन्नाथ कबाडी, सासू (नाव माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-43.jpg)
सायली व डॉ. सुशील कबाडी यांचे १४ डिसेंबर २०१६ रोजी लग्न झाले होते.तिला सासरी दोन वर्षे चांगले नांदवले.त्यानंतर जेवण करता येत नाही,तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही,असे म्हणून माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये,अशी वारंवार मागणी सासरच्या मंडळींकडून केली जाऊ लागली.
तिला शिवीगाळ,दमदाटी, मारहाण केली.शारीरिक, मानसिक छळ केला, क्रूर वागणूक दिली.सायलीच्या अंगावरील जखमा पाहता,आरोपीने कपड्याने बांधून आत्महत्या केल्याचा बनाव केला आहे.सायली यांनी आत्महत्या केल्याचे समजताच डॉक्टरांनी घरातील सदस्यांच्या मदतीने दरवाजा तोडला.
त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच शहर बीट अंमलदार अरविंद चव्हाण पंचनामा करण्यासाठी गेले होते. त्यांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन न करता अहिल्यानगर येथे मृतदेह पाठवला.शवविच्छेदन अहवालात मृत महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या
.त्यामुळे पोलिसांनी शेवगाव पोलिस ठाण्यात डॉ. सुशील कबाडी यांच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक काटे करत आहेत.