अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी पहाटे जागृत देवस्थान गहिनीनाथ महाराज देवस्थानच्या 11 घंटा चोरीस गेल्याची घटना घडलीय. दरम्यान याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.
अधिक माहिती अशी, या मंदिर देवस्थानचे काम चालू आहे. मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे आणि त्या सभामंडपाच्या सिमेंटच्या खांबाला एका मोठ्या लोखंडी पाईपला या अकरा लहान-मोठ्या आकाराच्या घंटा बांधलेल्य होत्या.
पण चोरांनी लोखंडी पाईपसह या सर्व घंटा चोरून नेल्या. चोरी झाल्यानंतर सदर घटनेची खबर उपसरपंच श्रीकांत पवार यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून घटनेची माहिती घेतली. सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
पोलीस प्रशासनाने गावातील तीन व्यावसायिकांकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांचा सुगावा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात अपयश आले. मात्र चोरटे परिसरातीलच असावेत असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
याआधी देखील मंदिरातून तीन घंटा चोरीस गेल्या होत्या. त्यावेळी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. पण आता तब्बल पितळी 11 घंटा चोरी गेल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम