Ahmednagar Crime : शेतकऱ्याचा ऊस पेटवला ! ‘त्या’तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Published on -

Ahmednagar Crime : वांगी बुद्रुक शिवारातील ऊस पेटवून दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी शेतकरी कारभारी ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वांगी शिवारात शेती गट नंबर 35 मध्ये 4 एकर शेती आहे. सदरची शेती ही साठेखात करून विलास भाऊसाहेब होन याच्याकडुन घेतलेली आहे.

त्यापैकी अडीच एकर क्षेत्रामध्ये 265 जातीच्या उसाचे पिक एक वर्षापूर्वी लावलेले आहे. (दि. 14 ) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास माझा मुलगा अनिल बाजीराव ठोंबरे हा ट्रॅक्टर घेवुन शेत नांगरण्यासाठी पुढे गेला व मी त्याच्या पाठीमागुन मोटारसायकलवर गेलो.

तेव्हा माझ्या मुलाने ट्रॅक्टर वळविले असता, मला ट्रॅक्टरच्या उजेडात दोन ते तीन इसम आमच्या उसाच्या कोपऱ्यावर दिसले, तेव्हा मी व माझ्या मुलाने त्यांना आवाज दिला असता,

ते तेथून पळुन गेले.तरीपण मी टॅक्टरच्या लाईटच्या उजेडात त्यांना जाताना पहिले असता, पांडुरंग केजय बिडगर, अमोल केशव बिडगर, केशव आप्पासाहेब बिडगर हे तेथून पळताना दिसले.

यावेळी माझ्या मुलाने आरडाओरडा केला असता, आमच्या शेजारी राहणारे लोक जमा झाले व त्यांनी माझा ऊस विझवण्यास मदत केली. तरीपण अडीच एकर क्षेत्रापैकी माझा वीस गुंठे ऊस जळाला आहे.

तरी (दि. 14 ) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास माझे वांगी बुद्रुक शिवारात शेती गट नंबर 35 मध्ये असलेल्या अडीच एकर उसापैकी वीस गुंठे ऊस हा, पांडुरंग केशव बिडगर, अमोल केशव बिडगर, केशव आप्पासाहेब बिहार (सर्व रा. वांगी बुद्रुक, बाराचारी ता. श्रीरामपूर) यांनी पेटवून दिला

म्हणुन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात वरील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शंकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बाबर करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe