१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यातील एका गावात विचित्र गुन्ह्याची घटना घडली आहे.एका अल्पवयीन मुलीला २५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या वेळी तिच्या घरासमोरून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरासमोरून पळवून नेले आणि तिच्याशी बळजबरीने लग्न करून तिच्यावर सतत अत्याचार करून तिला गर्भवती केले असून तिला गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपात करण्याची घटना नगर तालुक्यातील गावात घडली.
तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर रक्षणातून बळजबरीने तिला पळवून नेऊन घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथे एका मंदिरात तिच्याशी लग्न केल्यानंतर त्याने तिला सावेडी, अहिल्यानगर येथील भाड्याच्या खोलीत ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार केला.या गुन्ह्यात आरोपीच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा सामील असल्याचे फिर्यादीत नोंदवले गेले आहे.

पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजल्यावर आरोपींनी तिला गर्भपात करायला जबरदस्ती केली.तिने त्याला नकार दिल्यावर तिला त्यांनी मारहाण केली.तसेच पीडितेच्या पालकांनी याविषयी जाब विचारल्यावर त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.घडलेला हा सर्व प्रकार पीडिताने बुधवारी कोतवाली पोलिसांना सांगितला.
याबद्दल बुधवारी पीडित अल्पवयीन (वय १७) मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध अपहरण, अत्याचार, पोक्सो आदी कलमानुसार फिर्याद दिली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला आहे.हा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यामुळे तो तपास कामासाठी त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.या गुन्ह्याच्या आरोपींमध्ये मुलीच्या पतीसह कुटुंबीयांचा सुद्धा समावेश आहे.पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तो तपासासाठी नगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.अधिक तपास तालुका पोलिस करत आहेत.