आधी झाला ‘बेपत्ता’ मग सापडला मृतदेह ! शहरात चाललंय तरी काय ?

२७ जानेवारी २०२५ :नगर मार्केट यार्ड पाठीमागील भवानीनगर येथून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह भवानीनगर परिसरात असलेल्या वेअर हाऊसच्या पाठीमागे २४ जानेवारीला दुपारी १२.४० च्या सुमारास मिळून आला आहे. इर्शाद मुजाहिद सय्यद (रा. भवानी नगर, वेअर हाऊस गोडावून समोर) असे या तरुणाचे नाव आहे.

इर्शाद सय्यद हा २० जानेवारीला महात्मा फुले चौकातून चक्कर मारुन येतो, असे सांगुन घराबाहेर गेला होता तो पुन्हा घरी परतला नव्हता. याबाबत त्याचे वडील मुजाहिद सय्यद यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.यावरून पोलिसांनी इर्शाद सय्यद नोंद केली होती.

अखेर बेपत्ता झालेला इर्शाद हा भवानीनगर येथे वेअर हाऊसच्या पाठीमागे २४ जानेवारीला दुपारी बेशुद्ध अवस्थेत मिळून आला.त्याचे चुलते तोफिक हरुण सय्यद यांनी त्यास उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बटुळे यांनी उपचारापूर्वीच इर्शाद हा मयत झाल्याचे घोषित केले.याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मृत इर्शाद याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, चुलते असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe