‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली फसवणूक; युवकाला १.३३ लाखांचा गंडा

Published on -

Ahmednagar News:कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली सर्जेपुरा भागातील तरूणाची १ लाख ३३ हजार २०० रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी येथील सायबर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात मोबाईल नंबर धारक व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गजराज अरूणे (वय २९, रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी यांना एका मोबाईल नंबरवरून फोन आला.

‘आम्ही कौन बनेगा करोडपती’ मधून बोलत आहोत. तुमचा मोबाईल क्रमांक हा लकी विनर म्हणून निवडला आहे. त्यावरून तुम्हाला २५ लाख रूपयांची लॉटरी देण्यात येत आहे.

त्यानंतर दुसऱ्या नंबरहूनही असाच फोन आला. या दोन्ही मोबाईल क्रमांक धारक व्यक्तींनी फिर्यादीशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला.

तसेच २५ लाखांची लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी प्रोसेसिंग फी, इन्कमटॅक्सच्या नावाखाली सुरूवातीला काही पैसे त्यांचे गुगल पे अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले.

२५ लाख रूपये मिळणार या आशेवर फिर्यादीने २० ऑगस्ट २०२१ ते १० मार्च २०२२ या कालावधीत तब्बल १ लाख ३३ हजार २०० रूपये गुगल पे, तसेच बँक खात्यावर पाठविले.

त्यानंतर तिनही मोबाईल नंबर बंद झाले. नंतर अनेक वेळा संपर्क करूनही त्या मोबाईल धारकांशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही व त्यांना लॉटरीचे पैसेही मिळाले नाहीत.

त्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करत आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe