गली गली चोर मचाये शोर….वाढत्या चोऱ्यांनी नगर शहरातील नागरिक धास्तावले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  नगर शहरातील तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दुचाकी चोरीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढले आहे.

चोरांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरीचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. यामुळे नागरिकांच्या मनात चोरांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. शहरातील सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसर नव्याने विकसित होत आहे.

सावेडीचा वाढता विस्तार पाहता तोफखाना पोलीस ठाण्याचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. तोफखाना हद्दीत चोर्‍या, घरफोड्यांबरोबरच जबरी चोरीच्या घटना नेहमीच घडतात.

यांचा बंदोबस्त करण्यात तोफखाना पोलिसांना अपयश आले आहे. दरम्यान शहर पोलीस उपअधीक्षकपदी नव्याने रूजू झालेले पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी लक्ष घालून शहरातील वाढत्या चोर्‍या,

घरफोड्या, जबरी चोर्‍या व दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe