गुन्हेगारांच्या टोळीचा हैदोस; पाचजण गंभीर जखमी, एकाचा डोळा निकामी तर एकास पडले ४५ टाके

Published on -

अहिल्यानगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील गुंडांनी शनिवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान करंजी येथील संकेत हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील तीन गंभीर जखमींना उपचारार्थ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्यात एका जखमीचा गेला डोळा, तर एका जखमीस तब्बल४५ टाके पडलेआहेत. करंजी येथील सलमान जमादार पठाण टोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज करंजी गावात सकाळपासून कडकडीत बंदपाळण्यात आला आहे.

जिल्ह्यात सध्या गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक दिवस कसा उगवेल हे कोणीही सांगू शकत नाही. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यातील महाविद्यालयीन विध्यार्थ्याची अत्यंत निर्घृणपणे शरीराचे तुकडे तुकडे करून खून केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच परत एकदा जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळीने उच्छाद मांडला आहे .

करंजी गावात या टोळक्याने केलेल्या मारहाणीत पाच जण जबर जखमी झालेआहेत. दरम्यान यातील अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात हॉटेल व्यवसाय करणाऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे यातील एकास तब्बल ४५ टाके पडले असून एका जणाचा डोळा निकामी झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी आज सकाळपासूनच करंजी गाव बंद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe