Ahmednagar Crime : तहसीलदाराच्या घरी जाऊन शिवीगाळ करून दमदाटी ! वाळू तस्करावर गुन्हा दाखल

Published on -

Ahmednagar Crime : तहसीलदाराच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना सोमवारी रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास येथील मालपाणी नगर परिसरात घडली.

याबाबत येथील पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात राहणारा शुभम राहणे हा सोमवारी रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मालपाणी नगर परिसरातील घरी गेला.

त्याने तहसीलदारांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करून त्यांच्या घराची बेल वाजवली. त्याने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.तहसीलदारांनी दरवाजा न उघडल्याने या वाळू तस्कराने दरवाजावर थापा मारून शिवीगाळ केली.

त्यानंतर तहसीलदारांनी आपल्या घराचा दरवाजा उघडला. माझा कॉल का घेतला नाही, असे म्हणून या वाळू तस्कराने तहसीलदारांना शिवीगाळ व दमदाटी करून तो निघून गेला.

याबाबत तहसीलदार धिरज मांजरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम थोरात याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे पुढील तपास करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe