अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- गेल्या तीन वर्षांपासून सावेडी उपनगरातील संकट मोचन हनुमान मंदिरातील दानपेटी उघडलेली नव्हती. चोरट्याने ती दानपेटी फोडून त्यातील लाखो रूपयांची रक्कम चोरून नेली होती.
त्या चोरट्यास तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. महेश ज्ञानदेव शिंदे (वय 26 रा. तागडवस्ती, पाईपलाईनरोड, नगर) असे जेरबंद केेलेल्या चोरट्याचे नाव आहे.
15 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 दरम्यान सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा महेश शिंदे याने केल्याची खबर पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांना मिळाली होती.
ते पथकासह त्याचा तागडवस्ती परिसरात शोध घेत असताना आरोपी यशोदानगरच्या भाजी बाजार परिसरात असल्याची माहिती सोळुंके यांना मिळाली होती. तेथे सापळा लावून आरोपी शिंदे याला अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम