Ahmednagar Crime : हरेगाव मारहाण प्रकरण – अखेर ते दोघे आरोपी जेरबंद !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : हरेगाव येथे युवकांना मारहाणप्रकरणी दोघांना एलसीबीने अटक केली आहे. युवराज नानासाहेब गलांडे (वय ३६) व मनोज वसंत बोडखे अशी आरोपींची नावे असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने ही कारवाई केली. आतापर्यंत एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की शुक्रवारी घडलेली या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. या घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रविवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

दोन दिवसांत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यावे, अन्यथा मंगळवार दि. २९ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय श्रीरामपूर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. हरेगाव येथील कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे यांना हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती.

या घटनेच्या निषेधार्थ रविवारी हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यातील आरोपींना दोन दिवसात अटक करुन त्यांच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती.

या पार्श्वभूमिवर स्थानिक गुन्हे शाखेने या दोघा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी युवराज नाना गलांडे व मनोज बोडके या दोघांना पुण्यातील वारजे भागातून ताब्यात घेतले आणि श्रीरामपुरात आणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करत त्यांना काल सोमवारी न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. यातील आरोपींपैकी दीपक गायकवाड व पप्पू पारखे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या ४ झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe